Guhagar : जमीन वादातून दोन कुटुंबांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी; पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदूर घरटवाडी येथील दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादातून लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये फिर्यादी ६९ वर्षीय वृद्ध जखमी झाला आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील वेलदूर घरटवाडी येथील गणपत धाकू भुवड (वय ६९) यांचे व आरोपी पांडुरंग रघुनाथ भुवड (६०) यांचा गुहागर न्यायालयामध्ये जमिनीसंदर्भातील वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी आरोपी पांडुरंग रघुनाथ भुवड याने तीन कामगारांना घेऊन फिर्यादी याच्या घरासमोरील बांध फोडावयास सुरुवात केली त्याची विचारणा केली असता याचा राग मनात धरून पांडुरंग भुवड यांनी फिर्यातदार गणपत धाकू भुवड व त्याची पत्नी यांना मारहाण केली तसेच तीन कामगारांनी ही शिवीगाळ व धमकी दिली असे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये आरोपी व तीन कामगारांवर भारतीय न्याय संहिता ११८(१), १३१ ३२४(४), ३५१, ३५२, ३, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे अधिक तपास करत आहेत सध्या फिर्यादी जखमी वृद्धावर गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 26/Jan/2026