देवरुख : संगमेश्वर तालुक्यात पोलिसांनी गावठी दारू बाळगणाऱ्या एका इसमाला वांद्री येथे अटक केली आहे. वांद्री बाजार पेठकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, आंब्याच्या झाडाखाली झुडपांच्या आडोशाला संशयित बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून शशिकांत अनंत जाधव (५२, रा. उक्षी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू (किंमत ९५० रुपये) तसेच स्टीलचा ग्लास (किंमत १० रुपये) असा मुद्देमाल समाविष्ट आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संकेत सोपान आटोळे संगमेश्वर पोलिस ठाणे यांनी फिर्याद दिली असून, संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, पुढील तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 26/Jan/2026














