लांजा : दुर्धर आजारपणाला कंटाळून निवसर मलेवाडी येथील ३५ वर्षीय तरुणाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेदरम्यान घडली. संभाजी बाळकृष्ण किंजळे, असे त्याचे नाव आहे. संभाजी किंजळे दिवसभर वाडीमध्ये लग्न असल्याने तो दिवसभर तिकडेच होता. रात्री घरी आल्यानंतर त्याने आई व भावजयीला भावाला घरी घेऊन या, असे सांगून घरातून पाठवले. त्यानंतर त्याने लोखंडी बारला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई व भावजय घरी आल्यानंतर त्यांना हे दृश्य दिसले. हवालदार राजेंद्र कांबळे, नासिर नावळेकर, सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार जान्हवी मांजरे करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 26/Jan/2026














