रत्नागिरी : शहरातील कै. ल. ग. पटवर्धन जयराम नाटेकर बालक मंदिरात शुक्रवार, दि. २५ रोजी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी तयार केलेल्या कंदिलांनी वर्ग सजवण्यात आला. पणत्या, मेणबत्त्या लावून रोषणाई करण्यात आली. फराळाचे वाटप करण्यात आले. यावर्षी मातापालकांसाठी कोणत्याही पिठापासून रंगीत दिवे बनवायचे हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला मातापालकांचे चांगले सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन बालवाडी विभागप्रमुख कामिनी महाडिक व शिक्षक-सेविकांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 29/Oct/2024














