आजचे राशीभविष्य, २७ जानेवारी २०२६

मेष: स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक देवाण-घेवाणीत सावध राहा.

वृषभ: घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रांकडून लाभ होईल.

मिथुन: आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवासाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. दुपारनंतर थोडे सावध राहा.

कर्क: आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. दुपारनंतर शारीरिक उत्साहामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल.

सिंह: आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल.

कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील.

तूळ: ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम ठेवावा लागेल.

वृश्चिक: आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार – व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण – घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील.

धनु: आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल.

मकर: आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्या. शासकीय विषयात यशस्वी व्हाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत.

कुंभ: आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील.

मीन: आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 27-01-2026