सावर्डे : मुंबई कला संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत प्रथमेश गोंधळी याने राज्यात दुसरा, तर विशाल गोवळकर याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तसेच गौरव वाकचौरे याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.
कलासंचालनालय, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या प्रदर्शनासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या व्यावसायिक विभागातून शिल्पकार प्रा. रूपेश सुर्वे यांची निवड झाली आहे. तसेच विद्यार्थी विभागातून तब्बल २४ विद्यार्थ्यांच्या २६ कलाकृतींची निवड झाली असून, ही बाब महाविद्यालयाच्या गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शक व वर्गशिक्षक प्रा. रूपेश सुर्वे आणि प्रा. विक्रांत बोथरे यांना दिले योग्य मार्गदर्शनामुळे, सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे यश साध्य करता आल्याचे विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबरोबरच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचेही सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
सांगली येथे संपन्न होणाऱ्या या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या निवड झालेल्या कलाकृती झळकणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत : अभ्यासक्रम रुद्र शिवगण, कलाशिक्षक पदविका (प्रथम वर्ष) : शुभम लिब, कलाशिक्षक पदविका (द्वितीय वर्ष) नवाज हमदुले, तन्वी गोरीवले, सोनल घाणेकर, श्रावणी – कुळे. रेखा व रंगकला विभागातून सौरभ साठे, शिल्प व प्रतिमानबंधकला विभागात चैतन्य मांडवकर, शिवम नलावडे, संकेत गोरीवले, राज कुंभार, गौरव वाकचौरे, साहिल परुळेकर, विशाल गोवळकर, सोहम धामणस्कर, प्रथमेश गोंधळी, यशोदीप घुले, मिथिल आंगचेकर, आदित्य खर्डे, विराज खाडे, रुचित सांगळे, आयुष दहिवलकर, ज्योती पांचाळ आदींनी यश मिळवले आहे.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, संस्थेचे सर्व संचालक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, पूजा निकम, अनिरुद्ध निकम, प्राचार्य माणिक यादव तसेच प्राध्यापक आदींनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 27/Jan/2026














