Sangameshwar : तालुका जय भंडारी चषक कबड्डी -स्पर्धेत जुगाई कोसुंब संघ विजेता

साडवली : देवरुख भंडारवाडी एस. आर. चॅलेजर क्रीडा मंडळातर्फे आयोजित तालुकास्तरीय जय भंडारी चषक कबड्डी स्पर्धेत जुगाई कोसुंब संघाने निळकंठेश्वर वरचीआळी देवरुख संघावर मात करून विजेतेपद, तर निळकंठेश्वर वरची आळी देवरुख संघाने उपविजतेपद पटकावले.

तृतीय क्रमांक सोळजाई देवरुख, चतुर्थ क्रमांक जय हनुमान कांगणेवाडी देवरुख संघाने पटकावला. या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू सूरज जाधव (जुगाई कोंसुब), चढाई ओंकार पातेरे (निळकंठेश्वर वरची आळी), उत्कृष्ट पकड मयुर मिरगळ (जुगाई कोसुंब), पहिल्या दिवसाचा मानकरी पंचक्रोशी संघाचा आदित्य जाधव, दुसऱ्या दिवसाचा मानकरी विहागं जाधव (जुगाई कोंसुब), अंतिम सामनावीर सूरज जाधव (जुगाई कोंसुब) यांना गौरविले. सूत्रसंचालन कृणाल शिंदे व सुनील कंरबेळे यांनी केले.

बक्षीस वितरणला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बारक्या बने, महाराष्ट्र प्रदेश युवासेना सचिव प्रद्युम्न माने, वंचितचे कोकण प्रदेशाध्यक्ष रोहित तांबे, चिपळूण क्रिकेट असोसिएशन तालुकाध्यक्ष दशरथ दाभोळकर, प्रदीप सावंत, अभिजित शेट्ये, मंडळ अध्यक्ष पंकज पुसाळकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 27/Jan/2026