Chiplun : पाग मराठी शाळेतील रेणुका इरलेची नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड

चिपळूण : शहरातील पाग जिल्हा परिषद मराठी शाळेतील अभ्यासू व गुणवंत विद्यार्थिनी रेणुका इरले हिची नासा येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेतून तिची निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल नगराध्यक्षांच्यावतीने रेणुका इरले हिचा सत्कार करण्यात आला असून नासा अभ्यास दौऱ्यासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी रेणुकाच्या कर्तृत्वाचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रेणुकाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका पूजा धुरी, मुख्याध्यापक मोरे, आई पूनम इरले, नगरसेवक गणेश आग्रे, आरोग्य सभापती शुभम पिसे, संदेश किंजलकर, सुरेश काते, महेश शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रेणुकाच्या या निवडीमुळे पाग जिल्हा परिषद मराठी शाळेचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी बाब ठरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 27/Jan/2026