गुहागर : गुहागरनजीकच्या मोडकाआगर येथील श्रीपूजा फार्म हाऊसमधून पाणी पंपाच्या दोन आरमाड केबल चोरीस गेल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली. या बाबत अॅड. चिनार आरेकर यांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुहागर परिसरात सध्या विद्युत केबल चोरीचे प्रकार वाढले आहेत. वरवेली येथूनही पंपाच्या केबल चोरीस गेल्याची माहिती मिळत आहे. तालुक्यात केबल चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, काहीजणांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगून काही संशयास्पद आढळल्यास पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 27/Jan/2026














