रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पीक अवकाळी पावसाने नुकसान केले. भात-नाचणीसह ३ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रस्ताव कृषी विभागाने पाठवला होता. नुकसानीपोटी ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रूपयास मंजूरी मिळाली होती. आजअखेर जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे भात नाचणी पिके चांगल्या प्रकारे आले होते. यंदा भाताचे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा होती. ऐन भात कापणीच्या हंगामातच सातत्याने पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पिकाला अंकुर फुटणे, भात पीक आडवे झाले तर ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे भात पिकात पाणीच पाणी गेले होते.
खरीप पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. जिल्हाप्रशासनाच्या वतीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यासाठी आश्वासन दिले होते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ६६ लाख रुपये मंजूर झाले होते. ते पैसे टप्प्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून मिळालेल्या नुकसानभरपाई मुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
खेड, संगमेश्वर, चिपळूणच्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान…
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या ९ तालुक्यात पीकांचे नुकसान झाले होते. सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान खेड, संगमेश्वर, चिपळूण, दापोली, लांजा तालुक्याती झाले आहे. तर सर्वात कमी गुहागर, राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला होता. ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये वाटपास मंजूरी मिळाली होती. जिल्ह्यातील २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 27/Jan/2026














