Maharashtra Rain : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस!

Unseasonal rain in Maharashtra today : मुंबई : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून हिवाळ्याचा शेवट जवळ आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. थंडीचा कडाका आता हळूहळू कमी होत चालला असून अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे.

काही ठिकाणी ढगाळ हवामानामुळे (Unseasonal rain) सकाळच्या वेळेत धुके जाणवत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये हवामानाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.(Unseasonal rain)

महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण कायम राहिल्याने राज्यातून थंडीचा कडाका जवळपास गायब झाला आहे. पुणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ असून हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही तासांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. या बदलामुळे किमान तापमानात वाढ झाली असून सध्या हुडहुडी भरवणारा गारठा ओसरल्याचे चित्र आहे. पुढील २४ तास राज्यात अशीच ढगाळ आणि दमट स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी

दरम्यान, रायगड जिल्ह्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे पेणमधील गणपती मूर्ती कारखाने आणि वीटभट्ट्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कच्च्या मूर्ती तसेच वीटभट्ट्यांवरील विटा पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ठाण्यातील घोडबंदर रोड आणि परिसरातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे ठाणेकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

पावसामुळे वीटभट्ट्या, गणपती कारखाने यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, पेणच्या जोहे हमरापूर येथील भागात अवकाळी पाऊस झाला आहे, अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्ट्या, गणपती कारखाने यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची देखील माहिती आहे, त्याचबरोबर ठाण्यातील घोडबंदर परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात वातावरणात बदल झाला आहे, हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला होता.

थंडीच्या मौसमामध्ये पावसाने हजेरी लावली

नवी मुंबईतही अनेक भागात सकाळी पावसाने हजेरी लावली आहे. थंडीच्या मौसमामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेतील गारवा देखील वाढलेला आहे. सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. रायगड ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणी सकाळच्या सुमारास पावसाच्या सरी बरसले आहेत. पावसामुळे हवेतील गारवा काही प्रमाणात वाढला आहे.

भिवंडीत थंडीच्या दिवसात अचानक पावसाची हजेरी

भिवंडी शहर व ग्रामीण भागात थंडीच्या दिवसात अचानक पावसाने हजेरी लावली आहे. जानेवारी महिना संपत असतानाच आज सकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळेस नागरिक मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. जून-जुलै महिन्याची आठवण करून देणारा हा पाऊस जानेवारीत पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 27-01-2026