रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर; फेब्रुवारीत होणार वितरण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाद्वारे वार्षिक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दापोलीतील श्री शिंगेश्वर वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या वार्षिक अधिवेशनात करण्यात येणार आहे.

तसेच सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय विशेष पुरस्काराचे मानकरी गुलाबराव पाटील (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ) हे ठरले आहेत. उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार कमलेशा जनार्दन मुसलोणकर (संचालक, दुर्वांकुर ग्रंथालय, दापोली), उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार पद्मजा प्रेमप्रकाश कारेकर (ग्रंथपाल, नगर वाचनालय राजापूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्तिकरित्या वार्षिक अधिवेशन शनिवार, दि. ७फेब्रुवारी व रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. या अधिवेशनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांचे रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 27/Jan/2026