Gold-Silver Rate : जानेवारीत चांदी 112087 रुपयांनी महागली, सोन्याच्या दरात 25832 रुपयांची वाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंज प्रमाणं सोने आणि चांदीच्या दरात सराफा बाजारात देखील तेजी पाहायला मिळत आहेत. शुक्रवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात 4717 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर 24802 रुपयांनी वाढला आहे.

चांदीचा जीएसटीसह आजचा दर 352782 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा जीएसटीसह दर 163797 रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीचे दर दोन दिवसात 42796 रुपयांनी वाढले आहेत. तर, सोन्याचे दर 7899 रुपयांनी महागले आहेत. जानेवारीत चांदीचे दर 112087 रुपयांनी वाढले आहेत. तर, सोन्याच्या दरात 25832 रुपयांची वाढ झाली आहे. आज बाजार सुरु झाला तेव्हा जीएसटीशिवाय चांदीचा दर 342507 रुपयांवर होता. तर, सोन्याचा दर 159027 रुपये एक तोळा असा आहे.

23 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 4698 रुपयांची वाढ होऊ नते 158390 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 163141 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 4321 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 22 कॅरेट सोन्याचे दर 145669 रुपये प्रति तोळा असून जीएसटीसह हा दर 150039 रुपये झाला आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरात 3537 रुपयांची वाढ झाली असून याचे एका तोळ्याचे दर 119270 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 122848 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 2760 रुपयांनी वाढला असून 93031 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, आयबीजेएकडून दिवसातून दोनवेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात. हे देशभर सारखेच असतात, त्यात जीएसटी आणि मेकिंग चार्जेसमुळं बदल असू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 27-01-2026