ST BUS : एसटीचे मोबाईल अॅपने तिकीट काढण्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : एसटीतून रस्ते प्रवास सुखकर व्हावा तसेच तिकिटासाठी गर्दी टाळता यावी यासाठी एसटी महामंडळातर्फे एमएसआरटीसी मोबाईल आरक्षण अॅप सुरू केले. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, रत्नागिरी विभागास वर्षभरात सुमारे 25 कोटींचे उत्पन्न ऑनलाईन आरक्षणातून मिळाले आहे. राज्यात केवळ सप्टेंबर, डिसेंबर 2025 या दोन महिन्यात तब्बल साडेआठ लाखांहून अधिक प्रवाशांनी मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढून प्रवास केला आहे. एकंदरीत, ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची पहिली पसंती एसटीच्या एमएसआरटीसी अॅपला आहे. अॅपमधून तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा टक्का दिवसेंदिवस वाढतोय एवढं मात्र निश्चितं.

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेवून एसटी महामंडळ काम करत आहे. वाट पाहीन मात्र लालपरीनेच प्रवास करेन या निर्णयामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच सरकारच्या वतीने महिला, 65 वर्षावरील व्यक्तींना तिकिटात 50 टक्के आरक्षण, 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास अशी सवलत दिल्यामुळे लालपरीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्यांनी वाढली आहे. बाहेरगावी जाण्यासाठी तसेच दिवाळी, उन्हाळी सुट्टीत फिरायला, घरी जाण्यासाठी आगाऊ तिकीट काढण्यसाठी बसस्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे गर्दीत उभा राहून तिकीट काढावे लागत होते. प्रवाशांचा वाढती अडचण पाहून प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता यावे म्हणून एसटी महामंडळातर्फे एमएसआरटीसी मोबाईल अॅप सुरू केले. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढणे सोपे झाले.

जिल्ह्यासह राज्यभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ डिसेंबर 2025 मध्ये या एकाच महिन्यात पाच लाख एक हजार 966 प्रवाशांनी मोबाईल अॅपमधून तिकीट आरक्षीत करून प्रवास केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही अॅपच्या माध्यमातून तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारो, लाखोंनी वाढली आहे. रत्नागिरी विभागात मोबाईल अॅपच्या आरक्षणातून महिन्याला अडीच कोटींचे उत्पन्न मिळते तर वर्षाला सुमारे 25 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:58 PM 28/Jan/2026