संगमेश्वर : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मंगळवारी १३ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. आता २१ जागांसाठी तब्बल ६३ उमेद्वार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता गावागावातील निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात होणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी एकूण ७८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज छाननीत १ अर्ज अवैध ठरवण्यात आला. तर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १३ उमेद्वारांनी आपले अर्ज मागे घेतले. तर एका उमेदवाराने पक्षाकडून व अपक्ष उमेदवारी अर्ज भरता होता. यामध्ये पक्षाकडून भरलेला अर्ज एबी फॉर्म असल्यामुळे ग्राह्य धरण्यात आला. त्यामुळे अपक्ष भरलेला अर्ज निवडणूक विभागाच्या नियमानुसार आपोआप बाद झाला. त्यामुळे आता एकूण ६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्हा परिषद गटामधीलकडवई-महेंद्र नारायण कापडी, साडवली शीतल करंबळे व दाभोळे – मधुकर शंकर साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर पंचायत समिती गणामधील धामापूर तर्फे संगमेश्वर अक्षय अरुण चव्हाण, धामणी- अमित ताठरे व सुजित सुर्वे, कसबा अनंत रावजी शिवगण, परचुरी मधुरा मिथुन निकम, माभळे संकेत पंडित व दिलीप पेंढारी, निवे बुद्रुक सुरेश घडशी, साडवली- शितल करंबेळे, दाभोळे प्राजक्ता साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यापैकी प्राजक्ता साळवी (शिवसेना शिंदे गट), दिलीप पेंढारी (शिवसेना ठाकरे गट), अनंत शिवगण (शिवसेना शिंदे गट), सुजित सुर्वे (आप) व इतर सर्व अपक्ष उमेदवार आहेत. तर सुजित सुर्वे हे मयत झाल्याने त्यांचा अर्ज त्यांचे सूचक यांनी मागे घेतला. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जि. प. गट व पं. स. गणातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून आता स्थानिक विकास, सत्तासमीकरणे आणि पक्षीय ताकद यांची खरी कसोटी या निवडणुकीमध्ये पहायला मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 28/Jan/2026














