रत्नागिरी : गोगटे महाविद्यालयची विद्यार्थिनी श्रुती चव्हाण हिची तायक्वाँदो संघात निवड

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीची श्रुती रामचंद्र चव्हाण या विद्यार्थिनीची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला तायक्वांदो स्पर्धा २०२४ करिता मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली आहे. तिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रशिक्षक शाहरूख शेख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनचे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 29/Oct/2024