खेड-भरणे मार्गावर धुळीचे साम्राज्य

खेड : खेड ते भरणे रस्त्याच्या रुंदीकरण व पाणी पाईपलाईनच्या कामामुळे शहरातील रस्त्यांसह खेड ते भरणे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले असून यामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचे आजार व डोळ्यांचे विकार होत आहेत. या संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकामच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले.

खेड ते भरणे रस्त्यावरती रोज १ ते २ वेळा पाणी मारल्यास नागरिकांना होणारा धुळीचा त्रास कमी होऊ शकतो. पण संबंधित खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रोज रस्त्यावरती पाणी मारले जात नाही. याच अनुषंगाने भाजप गटनेते तथा नगरसेवक रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर व नगरसेविका स्वप्नाली चव्हाण यांनी खेड नगर परिषद मुख्याधिकारी व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले. खेड-भरणा रोडवर रोज किमान २ वेळा पाणी फवारणी व्हावी अशा सूचना सदर निवेदनामध्ये नमूद केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 28/Jan/2026