रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यत सोळाजणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. भाजपचे पदाधिकारी आणि बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नाचणकर दांपत्यांने उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र गोळपमध्ये उदय बने यांनी तर हातखंबामध्ये पर्शुराम कदम यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून दोन्हा गटांमध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. दोघांचीही निशाणी नारळ असणार आहे. एकूण सहा अपक्ष उमेदवार जि. प.ला रिंगणात आहेत.
रत्नागिरी तालुक्यात वाटद, खालगाव, हातखंवा, कर्ला व गोळप या जि.प. गटात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषदेच्या दहा गटांमध्ये ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ८ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये खालगावमध्ये सचिन पाचकुडे, हातखंबामध्ये सुनील कांबळे, खेडशी सुचिता संदीप नाचणकर, गोळप विनोद शिंदे, कोतवडे साधना साळवी, पावस सचिन गिजविले, संदीप शिंदे, वाटद रुपाली पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये गोळपमधील विनोद शिंदे हे उबाठाचे उमेदवार होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात माजी उपाध्यक्ष उदय बने यांना पाठिंबा दिला आहे. तर हातखंबा गटात शिवसेना शिंदेंचे बंडखोर उमेदवार माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांनीही रिंगणात कायम रहात रणशिंग फुंकले आहे. उदय बने व पर्शुराम कदम या दोघांनीही नारळ हे चिन्ह घेतले आहे. पंचायत समिती गणांमध्ये करबुडे गणातून मिलिंद खानविलकर, कर्लामधून आलिया बेगम मुराद अहमद मजगावकर, खेडशीतून संदीप कृषणा नाचणकर, कुवारबावमधून कल्पेश भार्गव जाधव, साखरतरमधून वैभव बोरकर, गोळपमधून विनोद शिंदे, कोतवडेतू स्वप्नील पड्याळ आणि साखरतर गणामधून नाझीम अब्दुल हमीद मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. पंचायत समितीच्या वीस जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 28/Jan/2026














