लांजात ९ उमेदवारांनी घेतली माघार; जि. प. व पं. स.चे ३५ उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीला जाणार सामोरे

लांजा : लांजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी १३ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ३१ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले होते. मात्र, मंगळवार दि. २७ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदच्या ४ तर पंचायत समितीच्या ५ उमेदवारी अर्ज उमेदवारांनी मागे घेऊन निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे जि. प. व पं. स. निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार निवडणूकिला सामोरे जाणार आहेत.

शिवसेना-भाजप युती, उबाठा सेना, राष्ट्रीय काँग्रेस, बसपा, रिपाई, मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपले उमेदवारी दाखल करण्यात आले आहेत. अपक्ष उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

अपक्ष उमेदवार तटस्थ राहून अर्ज कायम ठेवून निवडणकीला सामोरे जाणार आहेत. लांजा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दरम्यान, मंगळवार दि. २७ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीसाठी उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यांच्यात खऱ्या अर्थान लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी शिवसेना-भाजपा युतीकडून ४, शिवसेना उबाठा पक्षाकडून ६, रिपाई पक्षाकडून १, बसपा १, काँग्रेस १ असे एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी शिवसेना-भाजपा युती ८, उद्धव बाळासाहेब ठाकरे ८, काँग्रेस पक्षाकडून ३, मनसे १, रिपाई १, बसपा ४, वंचित बहुजन आघाडी १ आणि अपक्ष ५ असे एकूण ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिष गटातील निवडणुकीसाठी साठी १३ पैकी ४ जणांनी तर पंचायत समितीसाठी ३१ दाखल झालेल्या अर्जांपैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २६ अर्ज कायम राहिले आहेत.

जि. प. व पं. स. मिळून एकूण ३५ उमेदवार निवडणुकीला रिंगणात कायम राहिले असून प्रत्यक्ष निवडणूकिला सामोरे जाणार आहेत.

प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवार पुढील प्रमाणे :

जिल्हा परिषद गट आसगे
अनन्या अभिजित राजेशिर्के (उबाठा सेना), मनीषा गणेश लाखन (शिंदे शिवसेना).

जिल्हा परिषद गट भांबेड
विनिता विनय गांगण (शिंदे शिवसेना), अचला हरिश्चंद्र विश्वासराव (उबाठा शिवसेना).

जिल्हा परिषद गट- साटवली
लीला मोहन घडशी (शिंदे शिवसेना), मनीषा अनुज जाधव (काँग्रेस).

जिल्हा परिषद गट गवाणे
आनंद बाबू कांबळे (बहुजन समाज पार्टी), चेतन शांताराम दळवी (उबाठा शिवसेना), संतोष कृष्णा रेवाळे (शिंदे शिवसेना).

पंचायत समिती गण आसगे
मानसी सिद्धेश्वर आंबेकर (शिंदे शिवसेना), श्रावणी सचिन कांबळे (बहुजन समाज पार्टी), आसावरी किशोर मांडवकर (उबाठा शिवसेना).

पंचायत समिती गण वेरवली खुर्द
साक्षी भिकाजी चव्हाण (शिंदे शिवसेना), नीलिमा अलविन जाधव (उबाठा शिवसेना), मानसी मंगेश पवार (वंचित बहुजन आघाडी)

पंचायत समिती गण प्रभानवल्ली
आनंद बाबू कांबळे (बहुजन समाज पार्टी), राजेंद्र विश्राम घडशी (उबाठा शिवसेना), उमेश अरुण पत्की (शिंदे शिवसेना), संकेत शांताराम घाग (अपक्ष).

पंचायत समिती गण भांबेड
शैलेश मनोहर खामकर (भाजप), किरण प्रभाकर रेवाळे (मनसे), युवराज मारुती हांदे (उवाठा शिवसेना), सचिन पुंडलिक बेर्डे (अपक्ष).

पंचायत समिती गण वाकेड
रसिका रमाकांत मेस्त्री (शिंदे शिवसेना), दक्षता अनंत राजापकर (उबाठा शिवसेना).

पंचायत समिती गण साटवली
आदेश दत्तात्रय आंबोळकर (शिंदे शिवसेना), रमेश रामभाऊ कदम (उबाठा शिवसेना), उज्वल बाळकृष्ण पवार (बहुजन समाज पार्टी).

पंचायत समिती गण गवाणे
दीपाली जयवंत साळवी (शिंदे शिवसेना), पायल प्रशांत साळवी (उबाठा शिवसेना).

पंचायत समिती गण खानवली
चंद्रकांत शांताराम गीतये (बहुजन समाज पार्टी), प्रथमेश रमेश बोडेकर (काँग्रेस), लक्ष्मण सोनू मोर्ये (उबाठा शिवसेना), यशवंत देऊ वाकडे (शिंदे शिवसेना), संजय वासुदेव रेवाळे (अपक्ष).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 28/Jan/2026