रत्नागिरी : तालुक्यातील नाखरेफाटा येथे चिरेखाणीवर काम करणाऱ्या कामगाराचा दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रेश प्रतापसिंग गौड (वय २५, रा. चिरेखाण-निरुळ, रत्नागिरी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रेश हा दुचाकीवरुन जात असताना नाखरे फाटा येथे दुचाकी स्लिप झाल्याने पडला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा अपघात झाल्याची माहिती कामगारांना मिळालेल्या नंतर त्यांनी तात्काळ बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. या बाबत पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. मात्र अपघात कसा झाला. या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकित अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुर्णगड पोलिस अमंलदार अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 28/Jan/2026














