मंडणगड : जि. पं. समिती निवडणुक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. २७ जानेवारी रोजी मंडणगड तालुक्यात २ जिल्हा परिषद गट व ४ पं. स. गणाकरिता वैध ठरेलल्या ३१ उमेदवारी अर्जांपैकी १२ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले असून लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जि.प. बाणकोट गट १ मधून ६ उमेदवारी अर्ज दाखल होते. यातील प्रमिला शिगवण (अपक्ष), संतोष घोसाळकर (अपक्ष), संजय शेडगे (अपक्ष) या तीन अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटात प्रताप घोसाळकर (शिवसेना) प्रकाश शिगवण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सम्यक जाधव (बसपा) अशी तिरंगी लढत होणार आहे. गट भिंगळोली क्रमांक २ मधून ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील अमिता शिंदे (अपक्ष) सचिन थोरे (अपक्ष) संतोष घोसाळकर (अपक्ष) या तिघांनी आपले उमदेवारी अर्ज मागे घेतल्याने या गटात अस्मिता केंद्रे (शिवसेना) संतोष गोवळे (उबाठा शिवसेना) जमीर माखजनकर (कॉंग्रेस आय) अशी तिरंगी लढत होणार आहे.
इस्लामपुर पंचायत समिती गण १ मधून चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील रोशनी दिवेकर (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गणात वैष्णवी टक्के (शिवसेना उबाठा) स्मिता थोरे (भाजपा) प्रणाली चिले (शिवसेना) अशी तिरंगी लढत होणार आहे. भिंगळोली पंचायत समिती गण क्रमांक २ मधून सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील वसंत सुतार (अपक्ष) अनंत शिंदे (अपक्ष) या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गणात दीपक मालुसरे (शिवसेना) प्रवीण कदम (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), वामन जाधव (शिवसेना उबाठा), अब्दुलकादिर बुरोंडकर (काँग्रेस आय) अशी चौरंगी लढत होणार आहे. बाणकोट पंचायत समिती गण क्रमांक ३ मधून ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
यातील हरिश्चंद्र कोदेरे (अपक्ष) या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गणात मुस्ताक मिरकर (राष्ट्रवादी काँग्रेस) व अनिल राटाटे (शिवसेना) अशी दुरंगी लढत होणार आहे. तुळशी पंचायत समिती गण क्रमांक ४ मधून ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील प्राची पवार (अपक्ष) रेखा भागडे (अपक्ष) या दोन महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या गणात दीप्ती घडशी (शिवसेना) रत्ना मोहिते (भा.ज.प.) रेश्मा जाधव (वंचीत बहुजन आघाडी) मीरा कदम (शिवसेना उबाठा) अशी चौरंगी लढत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 28/Jan/2026














