Ajit Pawar Passed Away: धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान शेतात कोसळलं; लागोपाठ ४-५ स्फोट!

पुणे : Ajit Pawar Passed Away: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवारांचे विमान मुंबईवरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ झाले होते. तर बारामतीत ते ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला. त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. त्यामध्ये अजितदादांसोबत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे व्हीएसआर या खासगी कंपनीचे विमान असल्याची माहिती समोर आली आहे.

लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात कोसळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी माझ्या डोळ्याने अपघात होताना पाहिले आहे. सुरुवातीला असं वाटलं नाही कि, हे विमान क्रॅश होईल. तेव्हा ते एअर ट्रॅकवर उतरेल असा वाटलं होत. पण अचानक क्रॅश होऊन स्फोट झाला. पहिल्यांदा आग लागली. त्यानंतर लागोपाठ ४, ५ स्फोट झाले. खूप मोठी आग लागल्याने मदत करता आली नाही. पायलटने विमान लँडिंगसाठी प्रयत्न केले असतील. पण लँडिंग होऊ शकलं नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 28-01-2026