“माझा देव चोरला आज…”; अजित पवारांच्या निधनामुळे सूरज चव्हाण भावुक

आज अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी त्यांची कारकीर्द चांगलीच गाजवली होती.

लोकांचं काम करणारा नेता, म्हणून अजित पवारांची ओळख होती. अशातच अजित पवारांनी ज्याला घर बांधून दिलं अशा सूरज चव्हाणने दादांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.

अजित पवारांसोबतचा फोटो पोस्ट करुन सूरजने लिहिलंय की, ”मित्रांनो माझा देव चोरला आज… मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन… दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली… तुमचाच सूरज…”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 28-01-2026