दादांच्या जाण्याने मुस्लिम समाजाचे न भरून येणारे नुकसान : अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन

आरवली : स्पष्टवक्ता, अजातशत्रू आणि सामान्य जनतेचा हक्काचा नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याची बातमी अतिशय दुर्दैवी आहे. ‘दादांच्या ‘जाण्याने अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केली.

अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्थापन केलेली एक विशेष संस्था आहे. वार्टी, सारथी आणि महाज्योती च्या धर्तीवर ही संस्था स्थापन केली. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास, आणि शैक्षणिक सवलती पुरवल्या जातात. मुस्लिम बहुल वस्तीचा विकास व्हावा, यासाठी अल्पसंख्याक विभागाकडून भरघोस निधी देण्यासाठी अजितदादा पवार यांचा नेहमी प्रयत्न असे, असे अल्पसंख्याक सेलचे शेकासन यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 29/Jan/2026