उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन आरवली- माखजन परिसरात शोककळा; बाजारपेठा बंद

आरवली : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती दुर्दैवी निधन झाले. या निधनाची वार्ता समजताच आरवली माखजन परिसरात शोककळा पसरली. बाजारपेठ बंद करून अजितदादा पवार यांना व्यापारी जनतेकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनाची बातमी संगमेश्वर तालुक्यातील माखजन विभागात समजताच सर्व गावातील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी एकत्र येऊन प्रथमतः उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण दुःखाच्या यातनेतून सावरण्याची शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना केली. माखजन, आरवली बाजारपेठ पूर्णपणे बंद करून, अजित पवारांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 29/Jan/2026