Ratnagiri : खानू येथे आयशर कंटेनर अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खानू येथे १ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास आयशर कंटेनर पुढील कारला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता. यात कारमधील ५ जण जखमी झाले होते. या प्रकरणी मंगळवार, २७ जानेवारी रोजी कंटेनर चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईलियास अकबर हाजू (४८, रा. हर्चे शेलवाडी, रत्नागिरी सध्या रा. लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टेम्पो चालकाचे नाव आहे. अपघातात शौकत अलीसाहेब रखांगी (५०), सईद नूर खान (४०), दिलशाद रफिक नाईक (६५), सना सईद खान (३७), साकिब सईद खान (१३, सर्व रा. लांजा, रत्नागिरी) हे पाच जण जखमी झाले होते.

या प्रकरणी महिला पोलिस हवालदार तुप्ती सावंतदेसाई यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, १ जानेवारी रोजी संशयित कंटेनर चालक ईलियास हाजू हा आपल्या ताब्यातील कंटेनर (जीए-०५-टी-६०५३) घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने जात होता. तो मौजे खानू येथे आला असता पुढील कार (एमएच-०५-सीएच-३१२३) ला या भरधाव कंटेनरची धडक बसून हा अपघात झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 29/Jan/2026