चिपळूण : प्रजासत्ताक दिनी चिपळूणमध्ये गोवळकोट भोईवाडी येथील भोई समाजाच्या महिला मंडळातर्फे हळदी कुंकू समारंभानिमित्त वाशिष्ठी नदीची पूजा करून ओटी भरण्यात आली. भोई समाजाचा उदरनिर्वाह वाशिष्ठी नदीवर अवलंबून असल्याने या ऋणातून उतराई होण्यासाठी महिला मंडळातर्फे सलग तिसऱ्या वर्षी गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर, सचिव राजेश सैतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. महिला मंडळ अध्यक्षा सरस्वती कासेकर, उपाध्यक्षा मंजुळा कासेकर, गोवळकोट सातगाव ग्रामीण महिला सचिव संजीवनी जुवळे, प्रिया कासेकर, दीपाली जुवळे, आर्या जुवळे, अंजली सैतवडेकर आदी उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 29/Jan/2026














