जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजापुरातून २० उमेदवारी अर्ज मागे

राजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत त्यामध्ये चार उमेदवार जिल्हा परिषद गटातील आहेत, तर १६ उमेदवार पंचायत समिती गणातील आहेत.

राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. यापूर्वी निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर झाले होते. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी होती. त्या दिवशी एकूण २० उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये चार जिल्हा परिषद गटातील उमेदवार असून, त्यामध्ये श्वेता जयेंद्र कोठारकर, (साखरीनाटे गट) अनाजी खेमाजी गोटम आणि दीपक कृष्णा बेंद्रे, जुवाटी गट, संदीप रामकृष्ण कोलते, वडद हसोळं गट, यांचा समावेश आहे.

पंचायत समिती गणात माघार घेतलेले १६ उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. अनिल मारुती गुरव, सुनील कृष्णा म्हाद्ये, (वडदहसोळं गण) शंकर धाकू पटकरे आणि संदीप रामकृष्ण कोलते, (रायपाटण गण,) स्नेहा विलास नारकर, (तळवडे गण), मधुरा मंगेश सुतार (ताम्हाणे गण), प्रभावती गोपीनाथ कानडे, वैष्णवी संतोष कुळये, (केळवली गण), विलास कृष्णा गुरव, अरविंद अशोक लांजेकर (धोपेश्वर गण), सुनील मनोहर जठार, प्रफुल्ल हनुमान सुर्वे (पेंडखले गण), अश्विनी अनिल शेगुलकर (साखरीनाटे गण), अक्षयकुमार अशोक कारशिंगकर, सुहास पर्शुराम कुवरे, सुनील मनोहर जठार (कातळी गण) यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 29/Jan/2026