Ratnagiri : चांदसूर्या खेडशी येथे एसटी- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वारासह सहकाऱ्याचे पाय फ्रॅक्चर

रत्नागिरी : चांदसूर्या खेडशी चांदसूर्या एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेल्या सहकाऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या अपघातातील जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप सखाराम आंबेकर (वय ४२) आणि रंजन महादेव खापरे (वय ५६) हे दोघे बुधवारी सायंकाळी डफळचोळ वाडी येथून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी हातखंबा येथून रत्नागिरीकडे जाणारी एसटी बस येत होती.

डफळचोळ वाडीच्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना दुचाकीला एसटी बसची जोरदार धडक बसली. या धडकेत दिलीप आंबेकर व रंजन खापरे यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 29/Jan/2026