गुहागरात ५ जणांची माघार; ३८ उमेदवार रिंगणात

गुहागर : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ जागांसाठी निवडणूक रिंगणात राहिलेल्या ४३ उमेदवारांपैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. यामध्ये चार अपक्ष व एका राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा समावेश आहे. यामुळे आता १५ जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यातील ५ जि. प. गटाच्या जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील पडवे जि.प. गटातून अपक्ष उमेदवार तुकाराम निवाते, तर वेळणेश्वर गटातून अपक्ष उमेदवार आसावरी बाधवटे यांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहेत. पं. स.च्या १० जागांसाठी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतली. यात पाचेरी सडामधून अपक्ष उमेदवार रेणुका आग्रे, पडवे गणातून राष्ट्रवादीचे वसंत किल्लेकर, तर तळवली गणातून अपक्ष उमेदवार महेश शिगवण यांनी माघार घेतली आहे. यामुळे १० जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सर्वाधिक तळवली गणात भाजप, ठाकरे सेना, राष्ट्रवादी, बहुजन समाज पार्टी व काँग्रेस असे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 29/Jan/2026