देवरुख नगर पंचायत समिती सभापतीपदांची निवड

देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतिपदी प्राची भुवड, पाणीपुरवठा समिती सभापती यशवंत गोपाळ व महिला व बालकल्याण करण्यात आली आहे. सभापती श्रद्धा इंदुलकर यांची निवड करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये विशेष समित्यांचे सभापती व समिती सदस्यांची निवड गुरुवारी करण्यात आली. यामध्ये बांधकाम समितीमध्ये नगरसेवक दीपक खेडेकर, समृद्धी वेलवणकर, दीपक गेल्ये व निधा कापडी यांची निवड आहे.

स्वच्छता व वैद्यकीय समितीमध्ये नगरसेवक अक्षय झेपले, दीपक गेल्ये, स्वाती राजवाडे, निधा कापडी व उपनगराध्यक्ष वैभव पवार यांची निवड करण्यात आली आहे. पाणी व स्वच्छता कमिटीत नगरसेवक यशवंत गोपाळ, सिद्धेश वेल्हाळ, कविता नार्वेकर, दीपक गेल्ये, चंद्रकांत कामेरकर यांची निवड करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीत नगरसेविका रूपाली बेंद्रे, श्रद्धा इंदुलकर, नेहा आंबेकर व रितिका कदम यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व सभापती व समिती सदस्यांचे नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 29/Jan/2026