दीपोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उजळून निघणार

लखनौ : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात ३० ऑक्टोबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी २८ लाख दिव्यांनी राम मंदिर परिसर उजळून निघणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने दीपोत्सवात पुन्हा विक्रम रचण्याची तयारी केली आहे.

दिवाळीनिमित्त राम मंदिरात दीपोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दीपोत्सवाच्या काळात अयोध्येतील राम मंदिरकडे जाणारे १८ रस्ते बंद करण्यात येणार आहेत. शरयू नदीकडे जाणाऱ्या राम की पैडीकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. केवळ पासधारक भाविकांनाच दीपोत्सव बघण्याची परवानगी मिळणार आहे.

प्रत्येक मार्गावर एक पोलिस १८ चित्ररथांचे प्रदर्शन या दीपोत्सवामध्ये प्रभू रामचंद्रांवर आधारित १८ चिथरथांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. रामाच्या आदर्श जीवनापासून प्रेरणा मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकारी आणि चार ते पाच पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. छोटी दिवाळीनिमित्त ३० ऑक्टोबरला राम की पैडी आणि शरयू नदीच्या घाटावर २८ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अयोध्येतील हा पहिलाच दीपोत्सव असणार आहे.

अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अयोध्येत प्रथमच दीपोत्सव साजरा होत आहे. त्याची तयारी सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 29/Oct/2024