जयगड (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित असलेल्या ‘जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था लि., जयगड’ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीनंतर आज, २९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेत संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी श्री. रिझवान रियाज वाडकर आणि व्हाईस चेअरमनपदी श्री. नितीन विश्वनाथ पवार यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि त्याच दिवशी मतमोजणी करून संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज निवडून आलेल्या संचालकांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित संचालक मंडळ खालीलप्रमाणे:
- चेअरमन: श्री. रिझवान रियाज वाडकर
- व्हा. चेअरमन: श्री. नितीन विश्वनाथ पवार
- सर्वसाधारण सदस्य: श्री. मुस्तकीम शौकत नेवरेकर, श्री. जुनेद नजिर होडेकर, श्री. समीर बुनियाद मुजावर, श्री. संजय वामन परकर, श्री. प्रमोद प्रभाकर घाटगे, श्री. इरफ़ान सुलेमान साई
- इतर मागासवर्गीय सदस्य: श्री. नासिर दाऊद माखजनकर
- अनु. जाती-जमाती सदस्य: श्री. शरद काशिनाथ चव्हाण
- महिला राखीव सदस्या: सौ. जब्बीन मोहज्जीब मिरकर आणि सौ. मुबश्शिरा सालीम होडेकर
अभिनंदनाचा वर्षाव
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित समितीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जयगड परिसरातील मत्स्यव्यवसाय आणि कोळीबांधवांच्या विकासासाठी हे नवीन मंडळ कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल संपूर्ण जयगड परिसरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.














