Khed : वेरळ येथे दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ-वाशिष्ठी डेअरी परिसरात गुरुवारी (दि. २९) दुपारी सुमारे ११:२५ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने पाठीमागून दुचाकीला (एमएच-०८-एन-६२४६) ला धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (४०, रा. खेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिज यांच्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी वेळेवर मदत करून रुग्णाला रुग्णालयात पोहोचवले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. घटनेबाबत पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 30/Jan/2026