Will Arijit Singh Enter Politics After Retirement: प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. अरिजीत सिंगने निवृत्तीची घोषणा करताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, अरिजीत पुढे नेमकं काय करेल? त्याच्या भविष्यातील नेमक्या योजना काय आहेत? असे अनेक प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहेत. दरम्यान, अरिजीत लवकरच एक राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिजीत सिंह लवकरच राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करत आहे. त्याचा राजकीय प्रवास लवकरच सुरू होऊ शकतो. 2026च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तो सहभाग घेणार नसल्याची माहिती आहे. तो सर्वात आधी तळागाळातील निवडणुका लढवण्याचा विचार करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अरिजीत सिंहने अद्याप त्याच्या राजकीय कारकिर्दीबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, अरिजीत 2026मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका लढवणार नाही. प्रथम तो ग्रासरूट लेव्हलच्या निवडणुका लढवू शकतो. अरिजीत हा पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंजचा रहिवासी आहे. तो अत्यंत साधे जीवन जगतो आहे. अरिजीत बऱ्याचदा लोकांना मदत करताना दिसला. याचा त्याला राजकीय कारकिर्दीत मदत होऊ शकते, असं बोललं जात आहे.
अरिजीत सिंहने एका इन्स्टाग्राम पोस्टमधून प्लेबॅक सिगिंगमधून निवृत्तीची घोषणा केली. ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होताच चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मला इतके प्रेम देणार्या सर्व श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी प्लेबॅक गायक म्हणून आता कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. हा प्रवास खरंच अद्भुत राहिला आहे”, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं. त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. चाहत्यांना मोठा धक्का बसला.
अरिजीतने आतापर्यंत गेल्या दशकभरात बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. ‘तुम ही हो, चन्ना मेरेया, अगर तूम साथ हो, राबता, केसरिया, ए दिल है मुश्किल, तेरा यार हूँ मैं, तुझे कितना चाहते हैं’ या गाण्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, ‘ओ रोमिओ’ या चित्रपटातील एका गाण्यालाही त्याने आपला आवाज दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 30-01-2026














