Guhagar Beach | गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम

गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर गुहागरवासीयांबरोबर बोरोसिल कंपनीनेही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन दोन किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ केला आहे. बोरोसिल कंपनीच्या पुढाकाराने किनारा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. गुहागरला लाभलेल्या सहा किलोमीटरच्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यामुळे गुहागर पर्यटनाचा हब ठरला आहे. गुहागर नगरपंचायतीच्या वतीने या समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा प्राथमिक दर्जा प्राप्त झाला आहे. समुद्रकिनाऱ्याला अंतिम दर्जा प्राप्त होण्याकरता नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपंचायत व बोरोसिल कंपनी यांच्यावतीने व मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पाटणकर यांच्या उपस्थितीमध्ये ४० सदस्यांनी व नगरपंचायतीचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, कर्मचारी या सर्वांनी मिळून समुद्र चौपाटी, सुरू बन यांसह दोन किलोमीटरचे क्षेत्र स्वच्छ केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 30/Jan/2026