खेड : तालुक्यातील खोपी फाटा येथे मुंबई गोवा महामार्गवर दिनांक २७ रोजी सायंकाळी ५ वा. चे सुमारास प्राण्यांना क्रूर व निर्दयतेने वागणूक देत वाहतूक करणाऱ्या विरोधात खेड पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून पाळीव जनावरांसह त्याचे वाहन ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिस ठाण्यातील कर्मचारी तेजस्विनी उमेश जाधव (खेड पोलीस ठाणे ता. खेड) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, समीर अशोक पवार (वय ३४) हा दि. २७ रोजी सायंकाळी महिंद्रा पिकअप टेम्पो (क्रमांक एम. एच ०६ बी. जी ३६२२) मधून कोणताही वाहतुकीचा परवाना, खरेदी विक्रीची पावती व वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र नसताना एक मोठी म्हैस व दोन रेड्यांना त्रास होईल अशा स्थितीत दाटीवाटीने निर्दयतेने डांबुन व हौद्यास ताडपत्रीने बंधीस्त करुन बेकायदेशीर जनावरांची वाहतुक करीत असताना आल्याने ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 29/Oct/2024