राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालय यादीत राजापूर नगर परिषदेचे यश

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली. या गौरवपूर्ण यादीत राजापूर नगर परिषदेला १०० पैकी १०० गुण मिळवत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान मिळाले आहे.

राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली व कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना लिपिक अनुष्का जुवेकर व संगणक अभियंता गायत्री लिमये यांनी १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत आस्थापनाविषयक सेवा बाबी आणि ई-गवर्नन्स या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे हे यश साध्य झाले आहे. राज्यभरातील विविध नगर परिषद व नगर पंचायतांमधून निवडक कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये राजापूर नगर परिषदेचा समावेश होणे ही राजापूर शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 30/Jan/2026