Sangameshwar : कोसुंबमधील प्रवासी शेड नादुरुस्त; विद्यार्थांसह प्रवाशांचे हाल

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब विद्यालयाजवळील प्रवासी शेड नादुरुस्त झाली असल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या शेडकडे संबंधित विभागाचे अनेक वर्षे दुर्लक्षच आहे. या प्रवासी शेड वर किती खर्च करण्यात आला याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जात नाही. प्रवाशांच्या शेडच्या सुविधेसाठी निधी नाही, पण इतर सुविधेसाठी निधी उपलब्ध होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संगमेश्वर तालुक्यात अनेक प्रवासी शेडची अवस्था खराब झाली असून संबंधित विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक प्रवासी शेडकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने याबाबत आपण माहिती घेणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 31/Jan/2026