खेड : शहरातील मच्छीमार्केटच्या पाठीमागील बाजूस एका झाडाखाठी २ हजार ७१० रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य घेऊन तीनपत्ती पानाचा पत्त्याचा जुगार खेळ खेळणारे अजय विठोबा चव्हाण (५०, रा. चिंचघर-प्रभुवाडी, ता. खेड), समीर मोरे (३२, रा. सुसेरी नं. १, ता. खेड) व भरत जड्याळ (५२, भरणे – शिवाजीनगर जड्याळवाडी, ता. खेड) हे तिघेजण रंगेहात मिळून आले. पोलिस शिपाई वैभव ओहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या तिघांही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 31/Jan/2026














