रामपूर : भोम (ता. चिपळूण) येथील महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘एक धाव निसर्गासाठी, तुमच्या आमच्या आरोग्यासाठी’ या टॅगलाईन अंतर्गत तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. भोम विद्यालयातून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुले-मुली ४ कि.मी., १७वर्षांखालील मुले-मुली ६ कि.मी., खुला गट १८ वर्षापुढील गटासाठी ८ कि. मी. अंतर असेल. प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 31/Jan/2026














