देवरुख : देवरुखमधील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वैभव संसारे यांनी केली आहे. नगर पंचायत येथील संबंधित विभागाला फोन लावून विचारणा केली असता नागरपंचायतीकडे भटक्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्यांचे नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा नसल्याचे समजले व अशी प्रक्रिया राबवण्यासाठी या संदर्भातील निविदा प्रक्रियेचे काम चालू असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती संसारे यांनी दिली.
भर बाजारपेठेत अशा घटना घडत असून, आत्तापर्यंत सुमारे चार ते पाच घटना घडल्याचे निदर्शनास आले असून येथून रहदारी करणाऱ्या नागरिक, शाळा कॉलेजमधील मुले, व्यापारी, नोकरदार वर्ग यांच्यात भीतीचे वातावरण असून यावर तातडीने कारवाईची मागणी वैभव बापू संसारे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 31/Jan/2026














