Kokan Railway : वसई-चिपळूण कायमस्वरुपी मेमू सुरू करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा

चिपळूण : कोकण रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ तसेच इतर कोकण रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कोकण रेल्वेच्या बेलापूर मुख्यालयात यशस्वीरित्या झाली. या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध दीर्घकालीन मागण्यांवर चर्चा होऊन अनेक मुद्यांवर निर्णय घेण्यात आले. यामध्ये दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस लवकरच २२ डब्यांसह सुरु करण्यासह पनवेल चिपळूण मेमू पॅसेंजर वसईहून कायमस्वरूपी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आशुतोष श्रीवास्तव (कमर्शियल डिपार्टमेंट मॅनेजर), एल. प्रकाश (मेंटेनन्स व कन्स्ट्रक्शन), राजेंद्र कुमार शर्मा (यातायात विभाग), जुबेर पठाण (सुरक्षा आयुक्त), राजेंद्र दिनकर घोलप (तक्रार निवारण अधिकारी), राजेश ठोंबल (ट्रॅफिक ऑपरेशन), बाळासाहेब निकम (चिफ पर्सनल ऑफिसर) आणि पी. जी. नायर (डेप्युटी चीफ इंजिनिअर) उपस्थित होते. या बैठकीमध्ये सावंतवाडी टर्मिनस इमारतीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. टर्मिनस लाईनसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून सध्या निधीअभावी काम रखडल्याचे सांगण्यात आले. वांद्रे-मडगाव रेल्वे गाड्यांना अधिक थांबे देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 31/Jan/2026