गुहागर : बारामती येथे विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेने शहरातील भंडारी भवनात आयोजित श्रद्धांजली सभेत श्रद्धांजली अर्पण केली.
या सभेमध्ये तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी नगराध्यक्ष, नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांनी या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्प अर्पण केले. त्यानंतर प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, राष्ट्रवादीचे सचिव संतोष जोशी, नगराध्यक्ष नीता मालप, अमरदीप परचुरे, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, पराग कांबळे, नीलेश मोरे, भाजपाचे जिल्हा सचिव नीलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 31/Jan/2026














