Ratnagiri : मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ फेबुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थाची पूजा झाल्यानंतर ८ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिनेसाठी बाहेर पडेल., १२.३० वाजता आरती झाल्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या कार्यक्रमाला स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 31/Jan/2026