रत्नागिरी : कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील शिक्षक अमित पंडित यांच्या तिची लॉकडाउन डायरी या बालकादंबरीला वंदना प्रकाशनाचा आशीर्वाद पुरस्कार जाहीर झाला आहे.
आजवर त्यांनी ११ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेली तिची लॉकडाउन डायरी हे दहावे पुस्तक आहे. चेतक बुक्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुरस्कारासाठी आलेल्या २४० पुस्तकांमधून या कादंबरीची निवड ज्येष्ठ साहित्यिक नाटककार प्रा. रमेश – कोटस्थाने यांनी केली.
या आधी पंडित यांनी एकांकिका, दोन अंकी नाटक, कथासंग्रह, अनुवादित कादंबरी, अनुवादित कथासंग्रह अशी एकूण ११ पुस्तके लिहिली आहेत.
कोमसापचा पुरस्कार, पु. ल. देशपांडे नाट्यलेखन पुरस्कार, लळित साहित्य पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. बुधवारी (ता. ३०) मुंबई इथे मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक राजीव श्रीखंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 29/Oct/2024














