रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मौन पाळून शुक्रवारी आदरांजली वाहण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) विश्वजित गाताडे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मौन सुरू होण्यापूर्वी सकाळी १०.५९ वाजता इशारा भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११.०३ वाजता मौन संपल्याचा इशारा भोंगा वाजविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी २ मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही स्मरण यावेळी करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 31-01-2026














