रत्नागिरी : जयगड तालुक्यातील गणेशवाडी रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास करण्यात आली.
संतोष गणपत कुंभार (वय ५६, रा. कुंभारवाडी नांदीवडे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल प्रितेश लोटणकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी संशयित हा जयगड येथील गणेशवाडी रस्त्याच्या बाजुला एका झाडाखाली आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 31/Jan/2026














