दापोली : अखिल भारतीय १८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड येथील उपशिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमांतील सक्रिय सहभागाची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार सोहळा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे होणार असून, नामवंत साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्कारामुळे महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड तसेच दापोली तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. राजेश नरवणकर यांच्या या यशाबद्दल सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येच राजेश नरवणकर यांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, ‘सेवावृत्ती पांडुरंग शिंदे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ तसेच ‘कै. सदानंद बळीराम परकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’ यांचा समावेश आहे. अखिल भारतीय १८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड येथील उपशिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमांतील सक्रिय सहभागाची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार सोहळा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे होणार असून, नामवंत साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारामुळे महर्षी कर्वे शिक्षण संस्था संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड तसेच दापोली तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. राजेश नरवणकर यांच्या या यशाबद्दल सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येच राजेश नरवणकर यांना विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, ‘सेवावृत्ती पांडुरंग शिंदे गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ तसेच ‘कै. सदानंद बळीराम परकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’ यांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 31/Jan/2026














