लांजा : लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील लांजा आगरवाडी देवराई मार्गावरील चव्हाण घर ते तिखे घर या साधारणपणे दीड किमीच्या अंतरामध्ये काळोखाचे साम्राज्य असून या ठिकाणी लांजा नगरपंचायतीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
श्री चव्हाण घर ते तिखे घर या अंतरा दरम्यान लाईटची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लांजा देवराई येथून अनेक तरुण, लोक लांजा बाजारपेठेत कामधंदाच्या निमित्ताने ये-जा करत असतात. काहीजण दुकान व अन्य ठिकाणी कामाला आहेत. लांजा बाजारपेठेतील दुकाने साधारणपणे साडेसात ते आठ वाजता बंद केल्यानंतर हे कामगार आपल्या घरी जात असतात. मात्र वरील अंतरामध्ये असलेल्या काळोखाच्या साम्राज्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. याच परिसरात गेल्यात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. आणि बिबट्याच्या मुक्त संचारामुळे येथील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लांजा देवराई येथील कामगार वर्ग आणि लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नगरपंचायतीने चव्हाण घर ते तिखे घर या अंतरा दरम्यान स्ट्रीट लाईटची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 31/Jan/2026














